`रिलायन्स फ्रेश` मॉलमध्ये सडक्या भाज्या! Rotting vegetables at Reliance Fresh

`रिलायन्स फ्रेश` मॉलमध्ये सडक्या भाज्या!

`रिलायन्स फ्रेश` मॉलमध्ये सडक्या भाज्या!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

मॉल्समधून फळं आणि भाज्या खरेदी करत असाल, तर सावधान. या भाज्या नीट बघून मगच खरेदी करा. एका नामांकित कंपनीच्या दुकानात सडक्या आणि कुजक्या भाज्या सापडल्या आहेत.

रिलायन्स फ्रेशमधल्या भाज्या फ्रेश असतील असं समजून तुन्ही खरेदी करत असाल, तर भाज्या नीट पारखून घ्या. अन्न आणि औषध विभागाच्या कारवाईमुळे हे सांगण्याची वेळ आली आहे. म्हसरूळ परिसरातल्या रिलायन्स फ्रेशच्या मॉलवर छापा मारला असता, भाजीपाल्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. फळं, भाजीपाला सडलेला आणि कुजलेल्या अवस्थेत सापडला. काही भाजीपाल्याला चक्क बुरशी लागली होती. चिलटं आणि कीटकही घोंगावत होते. अन्न सुरक्षा कायद्यानुसार खाद्यपदार्थांजवळ रसायनं आणि विषारी पदार्थ ठेवता येत नाहीत. तरीही रिलायन्स फ्रेशमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती.

नुसता भाजीपालाच नाही तर ब्रेड, केक अशा खाद्यपदार्थांचीही मुदत उलटून गेल्यावरही विक्री सुरू होती. हे सगळं उजेडात आल्यावर नुसतीच कारवाई नको, तर रिलायन्सला दंडही ठोका, अशी मागणी ग्राहक पंचायतीनं केलीय.

कुठल्याही मॉलमध्ये किंवा डिपार्टमेंटल स्टोअरमधला भाजीपालाही नीट पाहून मगच खरेदी करणं आवश्यक आहे. आणि कुठेही अशा प्रकारे निकृष्ट भाजीपाला आढळला तर पुढे येऊन त्याची तक्रार करणं त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. जागरुक ग्राहकाची भूमिका सगळ्यांनीच बजावायला हवी.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 13, 2013, 19:06


comments powered by Disqus