`सागवान` तस्करीसाठी रूग्णवाहिकेचा वापर, Sagwan smuggling in Jalgaon

`सागवान` तस्करीसाठी रूग्णवाहिकेचा वापर

`सागवान` तस्करीसाठी रूग्णवाहिकेचा वापर
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव

महागड्या सागवान लाकडाची तस्करी करण्यासाठी चक्क आरोग्यविभागाच्या रूग्णवाहिकेचा वापर केल्याची धक्कादायकबाब उघड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात हा प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभाग हादरले आहे.

महाराष्ट्रातील सातपुड्याच्या जंगलातून मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशातील आदिवासी महागड्या लाकडाची तस्करी करतात. या लाकडांची तस्करी करण्यासाठी सायकल, मोटारसायकल यासह मोठी वाहनही हे चोरटे वापरतात. मात्र वनविभागाच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरात उघडकीला आलाय.

गोपनीय माहितीवरून वनविभागाच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून सागवान लाकडे भरलेली रुग्णवाहिकेचा पाठलाग केला. यावेळी वन विभाग पथकाच्या जिपला धडक देत दगडफेक करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यात हे चारही चोरटे फरार होण्यात यशस्वी ठरले.

या कारवाईत ३५ हजारांचे सागवान लाकूड जप्त करण्यात आले. चोरट्यांनी लाकूड चोरीसाठी रुग्णवाहिकेचा वापर केल्यानं या घटनेचे गांभीर्य वाढलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 09:16


comments powered by Disqus