Last Updated: Tuesday, February 25, 2014, 23:14
www.24taas.com,झी मीडिया, नाशिकआगामी लोकसभा निवडणुका एका एक दिवस जवळ येत असल्यानं भूमिपूजन आणि उद्घाटनांची मालिकाच सध्या सुरु आहे.
त्यात आज भर पडली नेचर्स बोट क्लबचं उद्घाटन आणि अँडव्हेंचर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कन्व्हेन्शन सेंटरच्या भूमिपूजनाची.
सुप्रसिद्ध बॉलिवूड स्टार सलमान खान आणि सुनील शेट्टी यांच्या उपस्थिती हा उद्घाटन आणि भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.
नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास मंडळानं गंगापूर धरण परिसरात हा बोट क्लब उभारलाय. यावेळी सलमान आणि सुनीलनं बोट सफरीचा आनंदही लुटला.
खासदार समीर भुजबळ यांच्या विकासवारी या विकास कामांची माहिती सांगणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं.
सलमाननं समीर भुजबळांच्या कामचं कौतुक करत पाच वर्षांपूर्वी समीरनं दिलेलं आश्वसन पूर्ण केल्याचं सल्लू म्हणाला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 25, 2014, 23:14