Last Updated: Thursday, January 31, 2013, 16:59
www.24taas.com, नाशिकनाशिकच्या येवल्यामध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्यांच्या जाचाची तक्रार करण्यासाठी ही महिला सरपंचाकडे गेली होती. यावेळी सरपंचासह त्याच्या दोन साथीदारांनी बलात्कार केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे.
3 महिन्यांपूर्वी ही घटना घडली आहे. मात्र राजकीय वैमनस्यातून ही कारवाई होत असल्याचीही गावात चर्चा आहे... येवल्यामध्ये सरपंचाचा महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. न्याय मागायला आलेल्या महिलेवरच संरपंचासह दोघांनी बलात्कार केला आहे. या बलात्काराप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ३ महिन्यांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
सासरच्यांबाबत जाचाबद्दल न्याय मागणं तिला चांगलच महागात पडलं आहे. राजकीय आकसातून
ही कारवाई झाल्याची चर्चा मात्र सुरू आहे.
First Published: Thursday, January 31, 2013, 16:54