Last Updated: Tuesday, February 25, 2014, 15:19
www.24taas.com, झी मीडिया, जळगावशाळेतले दोघे शिक्षक मुलींची छेड काढतात या आरोपावरून चेअरमनला जाब विचारायला गेलेल्या पालकांवर संस्थाध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी रिव्हॉल्व्हर रोखल्याची खळबळजनक घटना घडलीय.
जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यातल्या बोरगाव बुद्रुक या गावातल्या सर्वज्ञ माध्यमीक महाविद्यालयात हा प्रकार घडलाय. पालकांची समजूत घालण्याऐवजी संस्थाध्यक्षाने शिक्षकांना पाठीशी घालत पालकांवर थेट पिस्तुलच रोखलं.
प्रभाकर पाटील यांचा हा पवित्रा पाहून भेदरलेल्या पालकांनी पोलिसांना पाचारण केलं. यावेळी काही पालकांनी संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड केली. यावर धरणगाव पोलिसांनी जमाव जमवणा-या पालकांवरच कायदाभंग केल्याची नोटीस काढली. तर चेअरमनला सोडून दिलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Tuesday, February 25, 2014, 11:11