ब्लू प्रिंट, नाशिक रस्त्यांबाबत ‘राज’ गप्प! Second Day Of Raj Thakre`s Nasik tour

ब्लू प्रिंट, नाशिक रस्त्यांबाबत ‘राज’ गप्प!

ब्लू प्रिंट, नाशिक रस्त्यांबाबत ‘राज’ गप्प!
www.24taas.com , झी मीडिया, नाशिक

राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून आज नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर राज ठाकरे आपला दौरा आटोपता घेणार आहे.

नाशिककरांसाठी आज भव्य जिम आणि योगा वास्तू उभारण्यात येणार आहे. नगरसेवकांच्या वॉर्डातील उद्घाटनं करत राज ठाकरे यांचा झंझावाती दौरा आटोपता घेणार आहेत. मात्र या दौऱ्यातून नाशिककरांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाल्याचं नाशिककरांमध्ये बोललं जातंय.

दरम्यान, काल राज ठाकरे यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. मात्र विकासाच्या ब्लू प्रिंटबाबत राज ठाकरे काहीही बोलले नाहीत. शिवाय त्यांना नाशिकच्या रस्त्यांबाबत होणाऱ्या टीकेबाबत विचारलं असता, “अनेक लोक काम करत नाही, टीका माझ्यावर का होतेय? मी काम करतोय आणि काम करुन दाखवणार, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे नगरसेवकांची झाडाझडती घेतील, असं वाटलं होतं. पण तेही दिसलं नाही. त्यामुळं एकूणच राज ठाकरेंच्या दौऱ्यातून नाशिककरांचा अपेक्षाभंग झालाय का, असा प्रश्न निर्माण होतोय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, September 5, 2013, 12:02


comments powered by Disqus