शिर्डी येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश sex racket in Shirdi

शिर्डी येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

शिर्डी येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

www.24taas.com, जळगाव

सेक्स रॅकेटसाठी महिलेचा वापर करून तोतया पोलीस अधिकारी बनून लाखो रूपयांची खंडणी उकळणा-या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हा शाखेनं पर्दाफाश केलाय. या टोळीनं राज्यात शिर्डी, नाशिकसह अनेक ठिकाणी लोकांनी फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.

अमळनेरमधील हुजेफा ताहेर या व्यापा-याकडून या टोळीनं अडीच लाख रूपये उकळले होते. व्यापारी हुजेफाला सुधा चौधरी या महिलेनं शिर्डी इथं बोलावलं होतं त्यानंतर त्यांना एका रूममध्ये घालून टोळीच्या इतर साथीदारांनी एसपी, डीवायएसपी असल्याची बतावणी करून छापा घातला.

याप्रकरणी त्यांनी हुजेफा यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सुधा चौधरी, दिनेश चौधरी, दीपक मगरे, गजेंद्र राजपूत, गणेश सोनावणे या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

First Published: Monday, August 27, 2012, 08:29


comments powered by Disqus