Last Updated: Tuesday, January 14, 2014, 09:12
www.24taas.com, झी मीडिया,अहमदनगर शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सुनील फाफाळे यास १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागान रंगेहाथ अटक केली.
नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या पथकानं ही कारवाई केली. कारकून सुनील फाफाळे यास अटक केल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडालीय.
शिर्डी येथे नुकतेच उभविभागीय दंडाधिकारी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या विभागाचे प्रांताधिकारी अजय मोरे यांचेकडे सध्या साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी असा दोन्ही खात्याचा भार आहे ते जास्त वेळ संस्थानच्या सेवेत गुंतल्याने अव्वल कारकून सुनील फाफाळे हेच जास्त काम पाहात होते. मात्र कामाचा मलिदा खात असलेल्या या कारकुना विरोधात एका नागरीकाने तक्रार केली.
घर बांधण्यासाठी केलेल्या प्लँनला संमती देण्यासाठी २० हजार रुपये फाफाळे यांनी मागितले होते आणि हेच लाचेचे पैसे घेताना त्यांचेवर संक्रांत कोसळीलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 14, 2014, 08:32