कसं तुटलं शिवबंधन? वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर?Shirdi Shivsena MP Bhausaheb wakchaure may joins Cong

कसं तुटलं शिवबंधन? वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर?

कसं तुटलं शिवबंधन? वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर?
www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी

शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढंच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील मिळणार आहे.

शिर्डी साई संस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी डिसेंबर २००८मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. २००९च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघातून सेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून ते लोकसभेवर खासदार म्हणून विजयी झाले. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा तब्बल १ लाख ३२ हजार ७५१ मतांनी पराभव केला होता. शिर्डीत मतदारांची संख्या १३ लाख ११ हजार होती. त्यामध्ये मराठा ४० टक्के, तर दलित-मुस्लिम समाजाची ३० टक्के मते होती. मात्र तरीही आरपीआयची पाटी कोरीच राहिली.

दृष्टीक्षेप शिर्डी मतदारसंघावर

> अनुसूचित जातीसाठी राखीव
> अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ
> शिर्डीमध्ये ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश
> काँग्रेसकडे ३, राष्ट्रवादीकडे २ तर शिवसेनेचा १ आमदार
> मराठा मतदार - ४० टक्के,
> दलित मुस्लिम - ३० टक्के

इतक्या मोठ्या मतांनी निवडणूक जिंकणार खासदार वाकचौरे शिवसेनेतून गेल्यास हा सेनेला मोठा धक्का समजला जातोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 4, 2014, 16:25


comments powered by Disqus