शिवसेनेच्या `प्रतापी` आमदारांचा अखेर राजीनामा!, shivsena mla anil kadam resignation

शिवसेनेच्या `प्रतापी` आमदारांचा अखेर राजीनामा!

शिवसेनेच्या `प्रतापी` आमदारांचा अखेर राजीनामा!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

टोलनाक्यावर महिलांना शिवीगाळ केल्यामुळे वादात अडकलेल्या आमदार अनिल कदम यांनी राजीनामा दिलाय. पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर कदम यांनी महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. आज त्यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलाय.

आमदार अनिल कदम आणि त्यांचे सहकारी बुधवारी मुंबई-आग्रा महामार्गावरून जात असताना, पीएनजी टोलवेजच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडवली आणि ओळखपत्र मागितलं. त्यामुळे कदम यांना आपला अपमान झाल्यासारकं वाटलं. त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत वादावादी सुरू केली. रागाच्या भरात आपण कोण आहोत आणि काय बोलतोय, याचं भानच त्यांना राहिलं नाही. महिला कर्मचाऱ्यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत त्यांनी शिवीगाळ केली आणि टोल नाका बंद पाडण्याची धमकीही दिली. `आमदारसाहेबांचा` हा पवित्रा पाहून त्यांच्या समर्थकांनी टोल नाक्यावर तोडफोड केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा आजपासूनच सुरू होणार असल्यानं हा विषय चांगलाच पेटला होता. त्यानंतर आज आमदार साहेबांनी स्वत:च उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 24, 2013, 21:13


comments powered by Disqus