देवीच्या अडीच किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरीला.., silver paduka of goddess stolen away from temple

देवीच्या अडीच किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरीला..

देवीच्या अडीच किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरीला..
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिकच्या सतीमाता मंदिरातल्या अडीच किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरीला गेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात वडांगळी गावात हे मंदिर आहे. आज पहाटे झालेल्या या प्रकारात वीस ते बावीस वयोगटातल्या दोन चोरांनी हा प्रकार केल्याचं उघड झालंय.

ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. पहाटे अंधारात तीन वाजता हे दोघे तरुण सती मातेच्या मंदिरात घुसले. आणि त्यांनी सतीमातेच्या पादुका उखडल्या. त्यानंतर दानपेटी फोडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण तेवढ्यात सायरन वाजल्यानं चोरट्यांनी पळ काढला. सुरक्षा रक्षकानं चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याला धक्काबुक्की आणि दगडफेक करत चोरटे पसार झाले.

महाराष्ट्रातले हे एकमेव सतीचं मंदिर आहे. नवरात्र दोन दिवसांवर आलं असताना चोरांनी देवी मंदिरांना लक्ष केल्यानं पोलिसांची झोप उडालीय. सगळ्या मंडळांनी सीसीटीव्ही लावावेत, असं आवाहन पोलिसांनी केलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 21:34


comments powered by Disqus