'टीसी'ने महिलेला रेल्वेतून ढकललं, महिलेचा मृत्यू , TC, THROUGH WOMEN FROM TRAIN

'टीसी'ने महिलेला रेल्वेतून ढकललं, महिलेचा मृत्यू

'टीसी'ने महिलेला रेल्वेतून ढकललं, महिलेचा मृत्यू
www.24taas.com, विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव

जळगावमध्ये रेल्वेच्या टीसीने एका महिलेला रेल्वेतून ढकलून दिलं, आणि रेल्वेखाली येऊन या महिलेचा मृत्यू झाला आहे.

या महिलेचं नाव उज्ज्वला पंड्या असं आहे. टीसीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

टीसीने या महिलेला ढकलल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

टीसीने या महिलेला एलटीटी-राजेंद्रनगर एक्स्प्रेसमधून खाली ढकललं असल्याचं सांगण्यात येतंय.

ही महिला जनरल तिकीटने रिझर्वेशनच्या डब्यात प्रवास करत असल्याचं सांगण्यात येतंय.

मात्र टीसीच्या अशा वागणुकीमुळे झालेल्या घटनेने सर्वच अवाक झाले आहेत.





* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 29, 2014, 08:49


comments powered by Disqus