Last Updated: Sunday, July 28, 2013, 23:25
www.24taas.com, झी मीडिया, मालेगावउच्चशिक्षित महिला शिक्षिकेला नोकरी आणि लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक शोषण आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली मालेगाव शहर पोलिसांनी चार शिक्षकांवर गुन्हा दाखल केलाय.
चार दिवसांपूर्वी शहरातल्या किदवाई रोडवरच्या महापालिका शाळेच्या आवारात शिक्षिकेने आत्महत्या केली होती. सय्यद मोहम्मद हाशिम याने या शिक्षिकेला नोकरी लावून देतो असं अमिष दाखवून लैंगिक शोषण केलं होतं. याबाबत महिलेनं पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी देताच तिची बदनामी करण्याची भीती चार शिक्षकांनी दाखवली.
त्यामुळे महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केलाय. पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केलाय. त्यातल्या महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. तर तिघं फरार आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, July 28, 2013, 23:25