Last Updated: Wednesday, October 16, 2013, 09:06
www.24taas.com , झी मीडिया, शिर्डीशिर्डीतलं साई मंदिर तसंच मुंबईतलं शिवसेना भवन उडवून देण्याची धमकी देणारं पत्र साई संस्थानाला मिळालंय. दिवाळीमध्ये 9 नोव्हेंबरला साईबाबा मंदिर उडवून देणार असल्याचं पत्र संस्थानाला मिळालंय.
याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेलं मातोश्री तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अंत्यविधी झाला ती शिवाजी पार्कवरील जागा उडवण्याची धमकी या पत्रात देण्यात आलीय.
संस्थान प्रशासनानं हे पत्र जिल्हा पोलिसांकडे सोपवलंय. शिर्डीचे प्रांताधिकारी अजय मोरे यांनीही या बातमीला दुजोरा दिलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 16, 2013, 09:06