Last Updated: Saturday, May 19, 2012, 08:04
www.24taas.com, नाशिक नाशिकच्या विकासाचा आढावा घेणारं आणि नाशिकच्या भविष्याचा वेध घेणारं 'झी 24 तास'चं नाशिक फर्स्ट आज नाशिकमध्ये पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि नाशिकचे महापौर यतीन वाघ यांच्या हस्ते नाशिक फर्स्टचं उद्घाटन होणार आहे. एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये पार पडणा-या या कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत.
नाशिक फर्स्टमध्ये शेती आणि शेती उत्पादने, उद्योग आणि पायाभूत सुविधा, गृहनिर्माण उद्योग, माहिती तंत्रज्ञान या विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.
First Published: Saturday, May 19, 2012, 08:04