Last Updated: Saturday, May 19, 2012, 13:56
www.24taas.com, शिर्डी शिर्डीच्या साईबाबांना आज मुबई येथील मुकेश गुप्ता या साई भक्ताने ३५ लाखांची सोन्याची घंटा तसेच कैलास अग्रवाल या साईभक्ताने २६ लाख रूपयांच सोन्याची झारी अर्पण केली आहे. या एकत्रित सोन्याच्या वस्तूंच बाजारमूल्य ५६ लाख रुपये आहे.
सोन्याच्या घंटेचं वजन १२३८ ग्राम तर सोन्याच्या झार-याच वजन ९२८ ग्रॅम इतक आहे.गुरुवार च्या मुहूर्तावर ही अनोखी भेट बाबांना अर्पण करण्यात आली आहे.नुकत्याच मंगळवारी झालेल्या कँश कौन्टिंग मधे चार कोटी रुपये दान भक्तांनी दिल होतं. त्यात गुजरात येथील साई भक्ताने दिलेल्या १५ लाख रुपयांच्या सुवूर्ण मुकुटाचा समावेश होता
भक्तांकडून साईबाबा चरणी सोन्याच्या वास्तु अर्पण करण्याचं प्रमाण एकंदरीत वाढतच आहे. काही दिवसांपूर्वीच शिर्डी साईबाबांच्या दोन भक्तांनी मंदिर समितीकडे ६० लाखांचं दान सुपूर्द केलंय. दिल्लीहून असलेल्या भक्तानं साईबाबाच्या चरणी तब्बल दीड किलो सोन्याची घंदी दान केलीय. तर मुंबईच्या भक्तानं ९०० ग्रॅमचं सोन्याचं भांडं साईबाबांच्या चरणी दान केलंय.
गेल्या ५ वर्षांपासून साईबाबांच्या चरणी लोटांगण घालून लाखोंच्या घरात दान करणाऱ्या दानशूरांची संख्या सतत वाढतेच आहे. साईबाबांच्या आत्तापर्यंत जवळजवळ २८० किलो सोनं तर ३००० किलो चांदी पडली आहे. ज्याची सध्याची किंमत असेल तब्बल तीन करोड रुपये.
First Published: Saturday, May 19, 2012, 13:56