घरकुल घोटाळा २५ नगरसेवकांना कोठडी - Marathi News 24taas.com

घरकुल घोटाळा २५ नगरसेवकांना कोठडी

www.24taas.com, जळगाव
 
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणातल्या १५ आरोपींना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर दहा आरोपींना ३० तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
२९ कोटी ५९ लाख रुपयांचा हा घोटाळा आहे. परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ४६ जणांना या प्रकरणी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. मात्र देवकर चौकशीला गैरजर राहिले. या घोटाळ्यात आमदार सुरेश जैन जामिनावर आहेत. ह्यामध्ये एकूण ९१ आरोपी आहेत.
 
शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांना जळगाव सत्र न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जैन यांना पंधरा लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन न्यायालयाने दिला होता. सुरेशदादा जैन यांना १९९४ सालच्या घरकुल घोटाळ्यातील सहभागा प्रकरणी अटक करण्यात आली होती.
 
 

First Published: Saturday, May 19, 2012, 20:21


comments powered by Disqus