शिर्डीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी - Marathi News 24taas.com

शिर्डीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी

www.24taas.com, शिर्डी
 
सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. याशिवाय प्रचंड गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवरही ताण पडला आहे.
 
शिर्डीत साई दर्शनासाठी दररोज भाविक मोठ्या संख्येनं येत असतात. सुट्टीच्या हंगामात ही संख्या दुपटी, तिपटीनं असते. सध्या उन्हाळी सुट्टी लागल्यानं अनेकजण कुटुंबासह शिर्डीत साईदर्शनासाठी येत .
 
त्यातच शनी शिंगणापूरमध्ये शनी जयंती साजरी होत असल्यानं भाविकांच्या संख्येत आणखीनच भर पडलीय. त्याचाच परिणाम म्हणून शिर्डीतल्या व्यवस्थांवर ताण पडतांना दिसतो आहे.
 
 
 
 
 

First Published: Sunday, May 20, 2012, 11:34


comments powered by Disqus