प्रतिक्षा नाशिक - मुंबई मालवाहू ट्रेनची - Marathi News 24taas.com

प्रतिक्षा नाशिक - मुंबई मालवाहू ट्रेनची

www.24taas.com, नाशिक
 
नाशिक जिल्हातील भाजीपाला आणि फळे व्यापाऱ्यांना आनंद खुश करणारी ही बातमी... मुंबईमध्ये भाजीपाला, फळे हा माल लवकरात लवकर आणि तेही स्वस्त दरात पोहचला जावा, यासाठी खास नाशिक – मुंबई - नाशिक अशा मालवाहू ट्रेनची योजना मध्य रेल्वे तयार करत आहे.
 
ही योजना प्रत्यक्षात येण्यासाठी चाचपणीही रेल्वेने सुरु केली आहे. दररोज किमान 100 टनापेक्षा जास्त भाजीपाला आणि फळांची वाहतूक या ट्रेनने करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. ही विशेष ट्रेन सुरु झाल्यास लासलगांव, मनमाड, नाशिक भागातील शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे. मुख्य म्हणजे जलद आणि स्वस्त वाहतुकीमुळे भाजीपाला-फळे या गोष्टी ग्राहकांना स्वस्त दरात मिळू शकतात.

First Published: Tuesday, May 22, 2012, 16:01


comments powered by Disqus