फी वाढवणारच, शाळेची मनमानी - Marathi News 24taas.com

फी वाढवणारच, शाळेची मनमानी

www.24taas.com, मुकुल कुलकर्णी, नाशिक 
 
नाशिकमध्ये रासबिहारी शाळेनं केलेल्या फी वाढीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यासंदर्भात आज शाळा व्यवस्थापन आणि पालकांची चर्चा होणार होती. पण अचानक शाळेनं चर्चेला नकार दिला. त्यामुळे पालक चांगलेच संतप्त झाले.  नाशिकच्या रासबिहारी शाळेच्या बाहेर घोषणा देऊन पालकांनी शाळेच्या मनमानीचा निषेध केला आहे.
 
रासबिहारी शाळेनं तब्बल ६३ टक्के फी वाढ केली. त्यासंदर्भात शाळेनं पालकांना सकाळी साडे दहा वाजता चर्चेला बोलावलं होतं. पण ऐनवेळी शाळेनं फी वाढीवर ठाम असल्याचं सांगत चर्चेला नकार दिला. त्यामुळे शाळेविरोधात आक्रमक झालेल्या पालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार नोंदवली आहे. यासंदर्भात मनपाच्या शिक्षण मंडळानंही शाळेना नोटीस बजावली. इतकी अवास्तव फी वाढ केल्यानं शाळेची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, अशी विचारणा त्यामध्ये करण्यात आली.
 
फी वाढीच्या विरोधात नाशिकमध्ये पालक संघाची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून जनहित याचिकाही दाखल करण्यात येणार आहे. शाळेनं फी वाढीचा निर्णय रद्द केला नाही, तर शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
 
 

First Published: Tuesday, May 22, 2012, 19:01


comments powered by Disqus