राजकारणीच विकतायेत साखर कारखाने- अण्णा - Marathi News 24taas.com

राजकारणीच विकतायेत साखर कारखाने- अण्णा

www.24taas.com, जळगाव
 
राज्यातील १८ सहकारी साखर कारखाने मोडीत काढून राजकारण्यांनी तेच कारखाने कवडीमोल भावात खरेदी केले असा आरोप करत अण्णा हजारे यांनी सहकारमंत्री हर्षवर्धन पाठील यांच्यावर जळगावात निशाणा साधला.
 
सध्या अण्णा हजारे जनलोकपाल आणि सशक्त लोकायुक्तासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते जळगावात होते आणि त्यांच्या जळगावातल्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. बालगंधर्वच्या खुल्या नाट्यगृहात ही सभा झाली. यासभेला दोन ते अडीच हजार अण्णा समर्थकांनी उपस्थिती लावली.
 
यावेळी त्यांचे सहकारी अरविंद केजरीवाल हेदेखील त्यांच्यासोबत होते. २५ जुलैला अण्णा दिल्लीच्या जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहेत तर आपणही सहभागी होण्याचे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी या सभेत अण्णा समर्थकांना केलं.
 
 
 

First Published: Tuesday, May 22, 2012, 19:13


comments powered by Disqus