Last Updated: Saturday, May 26, 2012, 18:54
www.24taas.com, नाशिक नाशिकमध्ये कांदा उत्पादक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांच्या आत शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर पालकमंत्री छगन भुजबळांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभीमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ ३१ मेच्या भारत बंदला शेतकरी संघटनेचाही पाठिंबा असल्याचं शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
व्हिडिओ पाहा
संबंधित आणखी बातम्या
१.
शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टीचं ठिय्या आंदोलन
कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी संघटनेनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज ठप्प आहे.

२.मालेगावात पुन्हा ‘कांदोलन’कांदा दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेलं आंदोलनं आता चांगलचं पेटलंय. खासदार राजू शेट्टींसह ३ ते ४ हजार शेतकऱ्यांना अटक करण्यात आलीय. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनकर्ते जमलेत.

३. विधानभवनासमोर दूध ओतले, कांदे फेकले!कांदा, दूध आणि बेदाण्याला रास्त भाव देण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी थेट विधान भवनावर धडक मोर्चा नेलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात विधान भवनासमोर रस्त्यावर दूध ओतण्यात आलं.

४. शेतकरी संघटनांचा आंदोलनाचा इशाराविविध फळं, भाजी आणि मासाल्यांवरचं नियमन रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं शेतकरी संघटनांनी स्वागत केलंय. पण सरकारन हा निर्णय घेताल्यानंतर परत त्यावर हरकती मागावाल्यात. त्याला संघटनांनी जोरदार विरोध केलाय. त्याचबरोबर आंदोलनाचा इशारा दिलाय.

५. कांदा दराचे आंदोलन पोलिसांनी चिरडलंमहाराष्ट्र दिनाचा सगळीकडे जयजयकार होत असताना नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडलं. पण कांद्याचं आंदोलन येत्या काळात आणखी तीव्र होईल, याचे संकेत या आंदोलनानं दिले.
First Published: Saturday, May 26, 2012, 18:54