Last Updated: Monday, May 28, 2012, 13:35
www.24taas.com, नाशिक 
नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. राष्ट्रवादीचे जयंत जाधव आणि शिवसेनेचे शिवाजी सहाणे यांना समान मते मिळाली आहेत. त्यामुळं फेरमतमोजणी करण्यात येत आहे.
नाशिक विधान परिषदेच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. फेरमतमोजणीनंतरही दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी २२१ मते मिळाली आहेत. त्यामुळं निकालाबाबत पेच निर्माण झाला आहे.
मात्र दुसऱ्यांदा बरोबरी झाल्यानं कायदेशीर सल्लामसलत सुरू आहे. याबाबत आता पुढे काय निर्णय होणार यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येते आहे. तसेच काही मतं ही बाद ठरविण्यात आल्याने हा पेच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
First Published: Monday, May 28, 2012, 13:35