आबांनी केलं सेना, मनसेला लक्ष्य - Marathi News 24taas.com

आबांनी केलं सेना, मनसेला लक्ष्य


झी २४ तास वेब टीम, जळगाव
 
उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सेनेवर टीका केली आहे. यावेळी मनसेला मात्र आबांनी वेगळ्याच पद्धतीनं डिवचलंय. परप्रांतीयांना मुंबईतून हाकलण्यामध्ये खऱ्या अर्थानं मनसेपेक्षा शिवसेनेलाच अधिक श्रेय जातं असा टोला त्यांनी लगावला.
 
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात आर. आर. पाटील यांची सभा पार पडली. यावेळी आबांनी आपल्या भाषणात सेना-मनसेलाच लक्ष्य बनवलं. दरम्यान मुंबई ही समुद्रसपाटीपासून वर होती असा भौगोलिक दाखला देत आता शिवसेनेनं मात्र मुंबई खड्ड्यात लोटल्याची टीकाही आबांनी यावेळी केली.

First Published: Monday, December 5, 2011, 03:04


comments powered by Disqus