किस्सा मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट पत्राचा - Marathi News 24taas.com

किस्सा मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट पत्राचा

झी २४ तास वेब टीम, जळगाव
 
मुख्यमंत्र्यांच्या बनावट पत्राचा वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार जळगावमध्ये उघडकीस आलाय. बी जे मार्केटमध्ये एक रुपये चौरस फुटानं दोन हॉल्स भाड्यानं देण्यासंदर्भात एक प्रस्ताव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं जळगाव महापालिकेला पाठवला. मात्र हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयातून 16 नोव्हेंबरला चक्क मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसह आदेशाचं एक पत्र आयुक्तांना आलं. या पत्रात यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाला हा हॉल एक रुपये चौरसफूट दरानं भाड्यानं देण्याचा आदेश देण्यात आला होता.
 
मात्र या पत्रातल्या मजकुरातली भाषा अशासकीय असल्याचा संशय आल्यानं महापालिकेनं थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर असं कुठलही पत्र पाठवलं नसल्याचा खुलासा करण्यात आल्यानं या बनावट आदेशपत्राचं बिंग फुटलं. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून नेमकी कोणी ही बनावटगिरी केली याबाबत तपास सुरू आहे.

First Published: Friday, December 16, 2011, 12:56


comments powered by Disqus