परेराला तुरुंगात शाही वागणूक; चौकशी सुरू - Marathi News 24taas.com

परेराला तुरुंगात शाही वागणूक; चौकशी सुरू

www.24taas.com, नाशिक
 
‘हिट एन्ड रन’ प्रकरणात नाशिक जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या एलिस्टर परेरा या गुन्हेगाराला तुरुंगातच शाही वागणूक मिळत असल्याचं वृत्त ‘झी 24 तास’नं प्रसारीत केल्यानंतर तुरुंग प्रशासन खडबडून जागं झालयं. एलिस्टर परेराच्या शाही वागणुकीची डीआयजी स्तरावर चौकशी सुरु झालीये.
 
एलिस्टर परेरा या धनाढ्य पित्याच्या पुत्राला तुरुंगात शाही वागणूक मिळतेच कशी, कशा मिळतात या सवलती गुन्हेगारांना? असे सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न आता तुरुंग प्रशासनालाही पडलाय. त्यामुळेच यासंदर्भात चौकशी करण्यासाठी तुरुंग महासंचालक स्तरावरील दोन अधिकारी नाशिक जेलमध्ये दाखल झालेत. पश्चिम विभागाचे डीआयजी राजेंद्र धामणे आणि मध्य विभागाचे डीआयजी एस. एन. चव्हाण सध्या नाशिक तुरुंगात आहेत. ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

First Published: Sunday, June 3, 2012, 15:50


comments powered by Disqus