पोलीस स्टेशनसमोरच महिले घेतले जाळून - Marathi News 24taas.com

पोलीस स्टेशनसमोरच महिले घेतले जाळून

www.24taas.com, नाशिक 
 
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये केरोसिन ओतून जाळून घेण्याचा एका महिलेने प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. रत्ना शेजवळ नावाच्या या  महिलेनं पोलीस स्टेशनच्या आवारातून जाळून घेत थेट स्टेशनमध्ये धाव घेतली.
 
त्यात ती ऐंशी टक्के जळाली. तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र या महिलेने पोलीस स्टेशनसमोरच का आत्मदहन केलं याचं कारण समजू शकलेलं नाही.
 
मात्र आता पोलिसांनी तिला रूग्णालयात दाखल केले असून तिचा जबाब नोंदविण्यात आल्यानंतरच खरं कारण समचू शकणार आहे. मात्र अशा आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे पोलीस देखील काही वेळ गोंधळात पडले होते.
 
 
 
 
 

First Published: Sunday, June 3, 2012, 21:13


comments powered by Disqus