आता देऊळही बदलतयं... - Marathi News 24taas.com

आता देऊळही बदलतयं...

 www.24taas.com, नाशिक
 
मंदिरांची नगरी अशी नाशिकची ओळख. आता नाशिकमधली मंदिरं नव्या रुपात समोर येणार आहेत. मंदिरांचा पारंपारिक ढाचा बदलत मंदिरंही आता आधुनिक होत आहेत. निफाड येवला रस्त्यावरच्या हनुमानवाडीतलं आधुनिक शैलीतलं मंदिर सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेते आहे. प्रवेशद्वारावर आधुनिक टाईल्स, सुबक फॅब्रिकेशन, हवेशीर खिडक्या असं मंदिराचं रुप.
 
सूर्यचंद्राचं मंदिर खेड्यातल्याच ग्रामस्थांनी बांधलं आहे. त्यासाठी साडे पाच लाख खर्च आला. या मंदिरात सूर्य चंद्राबरोबरच हनुमान आणि खंडेरावही विराजमान होणार आहेत. नाशिक शहरातल्या मंदिरांचं रुपडही आता पालटतं आहे.
 
पंचवटीत सिमेंटच्या कृत्रिम टाईल्सनं बांधलेलं मंदिरही असंच आधुनिक शिल्प. साडे तीनशे वर्षापूर्वी उभारलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ते आजच्या युगातल्या मंदिरांमध्ये बांधकामाच्या विविध छटा पहायला मिळाल्या आहेत. आता येत्या काळात या मंदिरामध्ये आणखी बदल होणार आहेत.
 
 
 
 
 

First Published: Sunday, June 3, 2012, 21:23


comments powered by Disqus