झी २४ तासचा दणका; जेलर जेलबाहेर - Marathi News 24taas.com

झी २४ तासचा दणका; जेलर जेलबाहेर

 www.24taas.com, मुंबई 
 
‘झी 24 तास’च्या दणक्यानंतर अखेर एलिस्टर परेराची बडदास्त ठेवणाऱ्या नाशिक प्रभारी तुरुंग अधिकाऱ्याकडून पदभार काढून घेण्यात आलाय. यानंतर तब्बल ८ महिन्यानंतर नाशिकच्या जेलला पूर्णवेळ जेलर मिळू शकणार आहेत.
 
‘हिट अंन्ड रन’ प्रकरणात दोषी ठरलेला आणि धनाढ्य बापाचा बेटा असलेल्या एलिस्टर परेराला नाशिक जेलमध्ये कशी शाही वागणूक मिळते याचा ‘झी २४ तास’नं पर्दाफाश केला होता. यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलीय. त्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांवर कारवाई करत प्रभारी तुरुंग अधिक्षक शामकांत पवार यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आलाय. जयंत नाईक हे नाशिकच्या कारागृहाचे नवे जेलर असणार आहेत. पण नाशिक जेलला पूर्णवेळ जेलर मिळण्यासाठी तब्बल ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
 
झी 24 तासनं एलिस्टर परेरा या गुन्हेगाराला कारागृहात राजेशाही वागणूक मिळत असल्याची चित्रफीत दाखवली होती. यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिल होतं. त्यानुसार शामकांत पवार यांच्याकडून पदभार काढून घेतला असून जयंत नाईक यांच्याकडं तुरुंग अधिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आलीय.

First Published: Wednesday, June 6, 2012, 21:48


comments powered by Disqus