टोलवरून काँग्रेस-राष्ट्रवादीतही जुंपली - Marathi News 24taas.com

टोलवरून काँग्रेस-राष्ट्रवादीतही जुंपली

www.24taas.com, नाशिक 
 
टोलवरुन काँग्रेस -राष्ट्रवादीत जुंपली आहे.. टोलवरुन टीका करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी कृषीखात्यात लक्ष द्यावं, असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
 
आधी शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरवावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. राज्यातल्या टोलच्या कारभारावरुन मनसेनं पुकारलेल्या आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पाठिंबा दिला होता.
 
त्यानंतर विखे पाटील यांनीही या मुद्द्यावर टीका केली होती.. राष्ट्रवादीला कोंडीत गाठण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.. त्यावर आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
 
 
 
 
 

First Published: Friday, June 15, 2012, 21:25


comments powered by Disqus