Last Updated: Thursday, June 28, 2012, 23:28
www.24taas.com, नाशिक 
नाशिक जिल्ह्यातील पाढूर्ली गावाजवळ तीन जणांनी एका महिलेची लूट करत तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.
बलात्कार करणारे तिघे आरोपी फरार असून सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुगानालयात पाठविण्यात आलं आहे.
पोलिसांनी तिघा आरोपींचा शोध सुरु केला आहे. महिलेची लूट करून तिच्यावर तिंघानी जबरदस्तीने बलात्कार केला आहे. पिडीत महिलेनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
First Published: Thursday, June 28, 2012, 23:28