शहादा नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता - Marathi News 24taas.com

शहादा नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता

झी २४ तास वेब टीम, नंदुरबार
 
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेवर काँग्रेसने आपला झेंडा फडकावला. काँग्रेसने २४ जागांपैकी १७ जागा जिंकत नगरपालिकेत सत्ता काबिज केली. राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवर तर शिवसेना आणि अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला.
 
नंदुरबार जिल्हा हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला विजयकुमार गावितांसारखे खंदे नेतृत्व मिळाल्याने काँग्रेससमोर मोठं आव्हान राहिलं आहे. पण अखेरीस काँग्रसने आपला गड राखला.
 
दरम्यान शहादा नगर पालिकेच्या २४ जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं. शहादा नगरपालिकेच्या २४ जागांसाठी १०१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. शहादा नगरपालिकेसाठी सहा प्रभागातील सुमारे ७२ मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि सरासरी ६० टक्के मतदान झालं. दरम्यान या निवडणुकीसाठी काँग्रेसचे पद्मकार वळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयकुमार गावित यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती.

First Published: Sunday, December 11, 2011, 17:59


comments powered by Disqus