गायींची होतेय कत्तल, सुटका केलीच पाहिजे - Marathi News 24taas.com

गायींची होतेय कत्तल, सुटका केलीच पाहिजे

www.24taas.com, नाशिक 
 
नाशिक, गुजरातमधून कत्तलीसाठी नाशिकमध्ये आणलेल्या १७ गायींची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. यात आठ गायींचा समावेश आहे. एका गायीच्या वैद्यकीय तपासणीनंतर कृषी गो-सेवा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.
 
काल सकाळी गुजरातमधून नाशिकमध्ये कत्तलीसाठी जनावरे आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पंचवटी पोलिसांना माहिती मिळताचा त्यांनी सापळा रचला, आणि त्यामुळेच या १७ गायींना जीवनदान मिळालं.
 
राऊ हॉटेलजवळ जनावरांनी भरलेला ट्रक अडवला. मात्र तो न थांबल्याने संशय अधिक बळावला. पोलिसांनी पाठलाग करून बाजार समितीजवळ हा ट्रक ताब्यात घेतला. त्यात आठ गोर्‍हे, आठ गायी तसेच एक बछडा आढळून आला. यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन वाहनचालक फरारी झाला.
 
 
 

First Published: Tuesday, July 3, 2012, 16:40


comments powered by Disqus