येवल्यामध्ये ४ वाहनांचा अपघात, ४ महिला ठार - Marathi News 24taas.com

येवल्यामध्ये ४ वाहनांचा अपघात, ४ महिला ठार

www.24taas.com, नाशिक
 
नाशिक जिल्ह्यातील येवला कोपरगाव रोडवरील नांदेसर चौकीजवळच्या म्हसोबा माथा इथं चार वाहनांच्या विचित्र अपघातात ४ महिला जागीच ठार झाल्या तर १६ जण जखमी झाले आहेत.
 
जखमींना नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नगर जिल्ह्यातल्या मालुंजा येथून एक टाटा टेम्पो एका कार्यक्रमासाठी येवल्याकडे येत होता. यावेळी टाटा टेम्पो, लक्झरी बस ,ट्रक आणि नॅनो कार यांच्यात विचित्र अपघात झाला. या अपघातात चार महिला जागीच ठार झाल्या.
 
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावले. त्यांनी ताबडतोब जखमींना रुग्णवाहिका मागवून उपचारार्थ हलविले. ट्रकचालक व नॅनोचालक दोघेही आपापल्या वाहनात अडकून पडले होते. त्यांचीही सुटका करण्यात आली.

First Published: Wednesday, July 11, 2012, 12:12


comments powered by Disqus