Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:49
www.24taas.com, नाशिक वेळेत कर्जपरफेड न केल्यानं एका को-ऑपरेटीव्ह बँकेनं एका शाळेलाच सील ठोकण्याचा पराक्रम केलाय. पण, त्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसतोय.
नाशिक मर्चंट को ऑपरेटीव्ह बॅंकेकडून आनंदा एज्यूकेशन सोसायटीने १९९८ मध्ये २० लाखाचं कर्ज घेतलं होतं. मात्र, त्याची परतफेड न केल्याने बँकेनं शाळेला सील ठोकलं आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता शाळेतून बाहेर काढलं गेलं आणि पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याचं बँकेचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस माजी खासदार देवीदास पिंगळे आनंदा एज्यूकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाचे सदस्य होते.
First Published: Wednesday, July 11, 2012, 14:49