Last Updated: Saturday, July 14, 2012, 22:17
www.24taas.com, नाशिक 
भाडगी शासकीय आश्रमशाळेत शिकणारी एक आदिवासी विद्यार्थिनी गर्भवती अवस्थेत आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. १६ वर्षांची ती विद्यार्थिनी दहावीत शिकते आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या भाडगी शासकीय आश्रमशाळेतल्या गर्भवती विद्यार्थिनी प्रकरणात हेमराज चौधरी या युवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच हेमराजला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
१६ वर्षांची ती विद्यार्थिनी दहावीत शिकते आहे. शाळेत वैद्यकीय तपासणीच्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानं पुन्हा एकदा आदिवासी विकास विभाग काय करतं आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
First Published: Saturday, July 14, 2012, 22:17