लैलाच्या फार्म हाउसवर आरोपीसह पोलीस - Marathi News 24taas.com

लैलाच्या फार्म हाउसवर आरोपीसह पोलीस

www.24taas.com, इगतपूरी
 
लैला खानच्या प्रकरणात सखोल तपासाच्या दृष्टीकोनातून मुंबई क्राइम ब्रांचची टीम इगतपुरीत दाखल झालीय. लैला खानच्या फार्म हाउसवर मुख्य आरोपी परवेझ टाकसह सर्व साक्षीदार आणण्यात आलेत.
 
त्यांच्याकडून लैला खान हत्याकांडाचं संपूर्ण प्रात्यक्षिक करुन काही पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. मुख्य आरोपी परवेझ टाक अजुनही दिशाभूल करत असल्याचा संशय पोलिसांना असल्यामुळे वेगळ्या दिशेने तपास करण्यात येणार आहे. क्राईम ब्रांचच्या 3 अधिका-यांचा तपास आता लैला खानच्या फार्म हाऊसच्या शेजारी असलेल्या निनावी बंगल्याच्या दिशेनं सुरु झालाय.
 
निनावी बंगल्याचा तपास क्राईम बांचचे अधिकारी करतायत. तसंच लैला खानच्या बंगल्याकडं जाणा-या रस्त्यावर तसंच परिसरातही तपास करण्यात येतोय. यावेळी काही संदीग्ध वस्तूही जप्त करण्यात आल्यात. दरम्यान, लैला खानचे वडिल नाझीर खान यांनी या हत्येप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करुन सीबीआय चौकशीची मागणी केलीय

First Published: Tuesday, July 17, 2012, 17:06


comments powered by Disqus