वाळू व्यावसायिकांचा राडा - Marathi News 24taas.com

वाळू व्यावसायिकांचा राडा


झी २४ तास वेब टीम, जळगाव
 
जळगावात वाळू व्यवसायातल्या स्पर्धेतून २ व्यावसायिकांमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री वाळू व्यवसायिक कैलास भोळे आणि वीटभट्टी व्यवसायिक भिकन मन्नवरे यांच्यात धंद्यातील स्पर्धेतून जोरदार धुमश्चक्री झाली.
 
जळगावहून काही अंतरावर असलेल्या बांभोरी शिवारात हा प्रकार घडला. त्यांच्यात झालेल्या वादाचं पर्यवसान गोळीबारात झालं. भोळेने आपल्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरमधून ६ राऊंड फायर केल्या, त्यातली एक गोळी मन्नवरेच्या गटातल्या समाधान सोनावणेला लागली. यावेळी लाठ्याकाठ्यांनीही मारहाण झाली त्यात भोळे गटातले ४ जण जखमी झाले आहेत. एका गाडीचीही यावेळी तोडफोड करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असुन पोलिसांनी दोन्ही गटातील ५ जणांना अटक केली आहे

First Published: Thursday, December 15, 2011, 06:58


comments powered by Disqus