बस चालकांची गुर्मी; विद्यार्थी करतायत भरपाई - Marathi News 24taas.com

बस चालकांची गुर्मी; विद्यार्थी करतायत भरपाई

www.24taas.com, नाशिक 
 
विद्यार्थ्यांची ही तोबा गर्दी.... बस थांब्यावर न थांबता सुसाट धावणाऱ्या बस... बसमागे दप्तराचं ओझं सांभाळत धावणारे विद्यार्थी... नाशिकमध्ये कुठल्याही बसस्टॉपवर दिसणारं हे दृश्यं... चालक बसस्टॉपच्या आधी तरी बस थांबवतो किंवा नंतर  तरी... पण बस स्टॉपच्या ठिकाणी बस कधीच थांबत नाही...
 
नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. बसचालक बस व्यवस्थित पद्धतीनं थांबवत नाहीत, त्यामुळे तीन विद्यार्थी नुकतेच बसमधून पडले. ही घटना घडूनही प्रशासनानं त्यामधून कुठलाही धडा घेतलेला नाही. अधिकारी मात्र चौकशी करु... कारवाई करु... अशी थातूरमातूर उत्तरं देताना दिसतात.
 
नाशिकमध्ये शाळा आणि महाविद्यालयातले जवळपास ८० टक्के विद्यार्थी बसनं प्रवास करतात. पण बस चालकांच्या बेपर्वाईमुळं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
 
व्हिडिओ पाहा :
 

 
.

First Published: Wednesday, July 25, 2012, 09:31


comments powered by Disqus