भगवतगीतेवर बंदी आक्षेपार्ह - बाबा रामदेव - Marathi News 24taas.com

भगवतगीतेवर बंदी आक्षेपार्ह - बाबा रामदेव

झी २४ तास वेब टीम, अकोला


उपनिषद, वेद आणि धर्मग्रंथांमधून दिलेलें ज्ञान विश्वकल्याणासाठी आहे. त्यावर बंदीचा विचार हा आक्षेपार्ह असल्याची टीका बाबा रामदेव यांनी केली आहे.
 
रशियातील न्यायालयात भगवतगीतेवर बंदी घालण्यासंदर्भात खटला सुरू आहे. यावर बाबा रामदेव यांनी तीव्र टीका केली.  दरम्यान यासंदर्भात भारत सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी मागणी बाबा रामदेव यांनी केली आहे. रशियामध्ये भगवतगीतेवर बंदी घालण्यासाठी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यासंदर्भात ते अकोला जिल्ह्य़ातील देवरी गावात  बोलत होते.



भगवतगीतेच्या माध्यमातून धर्मांतरण आणि दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यात येत असल्याचा जावईशोध खटला दाखल करणा-यांनी लावल्याची टीका त्यांनी केलीये. यासंदर्भात सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र यासदर्भातील निकाल २८ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

First Published: Tuesday, December 20, 2011, 07:12


comments powered by Disqus