नाशिक वाहतूक पोलिसांची बसचालकांवर कारवाई - Marathi News 24taas.com

नाशिक वाहतूक पोलिसांची बसचालकांवर कारवाई

www.24taas.com, नाशिक
 
गेल्या काही दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या वाहनांच्या दुर्घटना घडल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभुमिवर नाशिक वाहतूक पोलिसांनी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांवर कारवाई केली असून रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत वाहनचालकांचं प्रबोधन करण्यात येत आहे.
 
नाशिकच्या डोंगरे वसतीगृहाच्या मैदान पोलिसांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत असे होर्डींग्ज लावले आहेत. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांकडून अनेकदा हलगर्जीपणा केला जातो. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनचालकांबरोबरच पालकांचही या सप्ताहाअंतर्गत प्रबोधन केलं जात आहे.
 
राज्य सरकारनं शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शिक्षणसंस्थांना जवळपास २५ नियम घालून दिले आहेत पण त्यांचं पालन होताना दिसत नाही. नियमांचं उल्लघंन करणाऱ्या अशा वाहन चालकांवर आणि मालकांवर मोटरवाहन अधिनियम कायद्यानुसार कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी घराजवळच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल करा, या बरोबरच परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, शिक्षणसंस्था आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुठलीही कसूर न करता एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे.
 
 

First Published: Thursday, January 5, 2012, 10:15


comments powered by Disqus