Last Updated: Friday, January 6, 2012, 20:48
www.24taas.com, जळगाव जळगाव शहरामध्ये डेंग्युची साथ पसरली आहे. डेंग्युमुळे रवींद्र घुगे या पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. तर सहा वर्षाच्या सोहम सोनार या बालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील रामेश्वर कॉलनी परीसरात अस्वच्छतेमुळे साथ पसरल्याची नागरिकांची तक्रार आहे. महापालिका केवळ श्रीमंत वसाहतीमध्येच साफसफाई करते. इतर भागांकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचं दुर्लक्ष होतं, अशी नागरिकांची तक्रार आहे.
शहरातील अनेक कॉलन्यांमध्ये सांडपाण्याची डबकी साचली आहेत. गटारांची दूरवस्था झाली आहे. त्यामुळं डासांची उत्पत्ती वाढली आहे.
First Published: Friday, January 6, 2012, 20:48