नाशिकमध्ये यंदा 'काँटें की टक्कर' - Marathi News 24taas.com

नाशिकमध्ये यंदा 'काँटें की टक्कर'

www.24taas.com, नाशिक
 
नाशिक महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याची चिन्हं आहेत. मतविभाजन टाळण्यासाठी छोट्या माशांना गळाला लावण्यासाठी सगळेच मोठे राजकीय पक्ष टपले आहेत. त्यामुळे यंदा महाआघाडी आणि महायुती असा सामना नाशिकमध्ये रंगणार आहे.
 
 
गेल्या निवडणुकीत नाशिककरांनी सर्वच प्रमुख पक्षांच्या पदरात जवळपास सारखंच मतदान टाकलं. त्याचबरोबर अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठीशीही नाशिककर उभे राहिले. त्यामुळे याच छोट्या पक्षांचं महत्त्व ओळखल्यानं सगळ्या मोठ्या पक्षांच्या नजरा छोट्या पक्षांकडे वळल्या आहेत. काँग्रेसनं भारिप बहुजन महासंघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, आरपीआय गवई गट, माकप यांच्याशी बोलणी सुरू केली आहेत.
 
 
गेल्या वेळी शेकाप, समाजवादी पक्षानं युतीला पाठिंबा दिला होता. पण आता आघाडीची नजर या पक्षांवर पडल्यानं युतीसमोर आव्हान उभं राहणार आहे.
 
 
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, भाजप या चारही पक्षांमध्ये युती आणि आघाडीबाबत प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू आहेत. त्यातच या सर्वांना मनसे फॅक्टरचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये यंदा काँटें की टक्कर होणार, हे निश्चित.
 

First Published: Wednesday, January 11, 2012, 22:38


comments powered by Disqus