Last Updated: Monday, January 16, 2012, 17:12
www.24taas.com, नाशिक 
नाशिकमध्ये अजूनही वाहनं जाळण्याचे प्रकार सुरुच आहेत. अंबडजवळ मोरवाडी इथं काही समाजकंटकांनी मध्यरात्री तीन मिनीट्रक जाळले आहेत. शहरात पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरु असतानाच समाजकंटकांनी हा धुमाकूळ घातला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात हे कोम्बिंग ऑपरेशन सुरु असताना ही घटना घडल्यानं पोलिसांसमोर या समाजकंटकांना आळा घालण्याचं मोठं आव्हान आहे. याआधीही नाशिकमध्ये गाड्या जाळण्याच्या घटना वारंवार घडल्यात. या वाहनं जाळपोळींच्या घटनांमुळे सर्वसामान्य नाशिकरांची झोप उडाली आहे.
First Published: Monday, January 16, 2012, 17:12