Last Updated: Wednesday, January 18, 2012, 12:47
www.24taas.com, सिन्नरमुंडे घराण्यातील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहिल्यांदा सिन्नरमध्ये तिखट प्रतिक्रिया नोंदविली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आपलं घरं का फुटलं? याचं आत्मपरिक्षण करावा असा जोरदार टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हे स्वत: काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत होतं. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे स्वतः पक्ष बदलण्याचा विचार करतात तेव्हा तो योग्य असतो, पण इतरांनी तो केला तर अयोग्य कसा?, असा बोचरा सवालही अजित पवारांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या बंडाच्या निशाणामागे राष्ट्रवादी असल्याचा आरोप होत आहे. मुंबईत आज भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या बंडखोरीमागे राष्ट्रवादीची फूस असल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत जायचं असेल तर त्यांनी खुशाल जावं, पण आधी आमदारकीचा राजीनामा देऊन जावं".
पक्ष सोडतांना पक्षात प्राप्त केलेली पद सोडून जा, ज्यांना राष्ट्रवादीत जायचं असेल त्यांनी खुशाल जावं, राजकारणात कुणीही कुणालाही बांधून ठेवत नाही, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
First Published: Wednesday, January 18, 2012, 12:47