कर्डिलेंचा दरबार बरखास्त...झी २४ तास इम्पॅक्ट - Marathi News 24taas.com

कर्डिलेंचा दरबार बरखास्त...झी २४ तास इम्पॅक्ट

Tag:  
www.24taas.com, अहमदनगर
 
 
भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या ससून हॉस्पिटलमध्ये दरबारप्रकरणी झी 24 तासच्या दणक्यानंतर अखेर पोलीस प्रशासनाला जाग आली आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दरबारावर आता यापुढं चाप बसणार आहे. शिवाजी कर्डिले यांना भेटण्यास आता मनाई करण्यात आली असून, यापुढं कोर्टाच्या ऑर्डरशिवाय त्यांना भेटता येणार नाही.
 
शिवाय कर्डिलेंची आजच ससूनमधून आता जेलमध्ये पाठवणी केली जाण्याची शक्यता आहे..... तसंच कर्डिलेंच्या दरबाराकडं दुर्लक्ष करणा-या दोषी पोलिसांवरही कारवाई होणार असून, या दरबारप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. झी 24 तासने काल कर्डिले यांच्या या राजरोस सुरु असलेल्या दरबाराचा पर्दाफाश केला होता.
 
दोन गंभीर गुन्ह्यांखाली अटकेत असलेले कर्डिले सध्या येरवडा जेलमध्ये मुक्कामी आहेत. मात्र प्रकृती अस्वस्थाचे कारण देत ते सध्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. निवडणुकांच्या काळात कर्डिले यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होतेय. कर्डिले हॉस्पिटलमधून झेडपी आणि पंचायत समित्यांसाठी तिकीटवाटप करत असल्याची चर्चा होती. अखेर झी 24 तासच्या दणक्यानं हा सर्व प्रकार बंद झाला.
 

First Published: Wednesday, January 18, 2012, 18:08


comments powered by Disqus