नाशिक-मुंबई रेल्वेसेवा ठप्प - Marathi News 24taas.com

नाशिक-मुंबई रेल्वेसेवा ठप्प

 www.24taas.com, नाशिक
 
नाशिक - असवाली स्टेशनजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे नाशिक-मुंबई वाहतूक बंद आहे. मालगाडीचे १२ डबे घसरल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
 
या अपघातामुळे पंचवटी एक्सप्रेस खोळंबली. याचा  त्रास प्रवाशांना झाला आहे. नाशिक - असवाली स्टेशनजवळ आज  सकाळी सातच्या सुमारास मालगाडीचे बारा डबे घसरलेत. त्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे पंचवटी आणि गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
 
दुरंतो एक्स्प्रेस नाशिकजवळील एका स्टेशनवर थांबून आहे. नाशिकहून मुंबईला नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांचे यामुळे हाल झाले आहेत. मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

 

First Published: Thursday, January 19, 2012, 12:37


comments powered by Disqus