Last Updated: Tuesday, January 24, 2012, 15:47
www.24taas.com, जळगाव 
जळगाव जिल्ह्यातून शेतकऱ्यांसाठी खास हॉर्टिकल्चर ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेही ही ट्रेन भुसावळवरुन निघणार असल्यानं केळी उत्पादकांना जळगांव ते भुसावळ असा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणारा आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वीच्या स्थानकावरुन माल नेण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.
जळगाव जिल्ह्यातील सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होते. मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन करणाऱ्या या जिल्ह्यातील बाजारपेठ मात्र उत्तर भारतात आहे. बाजारपेठेची अडचण लक्षात घेता शेतकऱ्यांनी वाहतुक व्यवस्थेच्या मागणी लावुन धरल्यानंतर केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकर घेउन भुसावळ ते आझादपूर हॉर्टिकल्चर ट्रेन सुरु करण्यात आली आहे.
प्रायोगिक त्तत्वावर सुरु करण्यात आलेली या सेवेतही अनेक नवे प्रयोग हाती घेण्यात आलेत. शेतकऱ्यांच्या दारात कंटनेर लोड करुन क्रेनमधून सरळ रेल्वेत कंटनेर लोड करण्यात येणार आहे. तसेच काही कंटनेर स्थानकावरच लोड करण्यात येतील. मालाची पॅकिंगही लूज , प्लास्टिक कॅरेटमध्ये आणि ,कारुटून बॉक्सेसमधून केली जाणार आहे यामुळे मालाची स्थिती कशाप्रकारे कमी खर्चात उत्तम राहणार याचं परिक्षण घेणार आहे.
केळी उत्पादकांसाठी ही उत्तम सुविधा असली तरी सुरुवातीला या ट्रेनचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांवर पडतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हॉर्टिकल्चर ट्रेन सावरा, निंभोरा आणि रावेरच्या स्थानकावरुन भरण्यात यावी अशी केळी उत्पादकांनी मागणी केली. सुरुवातील हॉर्टिकल्चर ट्रेनमधून केळीची वाहतुक होणार असली तरी भविष्यात द्राक्ष,डाळिंब,सफरचंद,कांदे अशा सगळ्या उत्पादनांची वाहतुक होणार आहे.
First Published: Tuesday, January 24, 2012, 15:47