Last Updated: Wednesday, June 20, 2012, 08:05
झी २४ तास वेब टीम, नाशिक
नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचं आणि बागेचं देखील पाणी पळालं आहे आणि त्याला महावितरणचे भारनियमन कारणीभूत ठरलं आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कृषिपंपांसाठी सध्या फक्त आठ तासच वीज पुरवठा होत आहे. सध्या छाटणीची वेळ असल्याने फवारणी करणं आवश्यक असतं आणि ती वेळेवर होण्यासाठी डिझेल इंजिन गरज भासते. नाशिकच्या बाजारपेठेत डिझेल इंजिनच्या मागणीत वाढ झाल्याने किंमतीत पूर्वीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारनियमनात वाढ झाल्याने साधारणत: १३ हजार रुपयांना मिळणारे इंजिनची किंमत १६ हजार रुपयांवर जाऊन पोहचली आहे. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चढ्या दराने इंजिन खरेदी करण्या शिवाय पर्याय उरलेला नाही. अहोरात्र मेहनत करुन बहरलेल्या बागेचं काय होणार या विंवचनेनं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
First Published: Wednesday, June 20, 2012, 08:05