Last Updated: Friday, January 27, 2012, 00:02
www.24taas.com, नाशिक मराठी माध्यमांच्या शाळांच्या स्वातंत्र्याचे रक्षण सरकारने करावे यासाठी नाशिकमध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यांत विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक सहभागी झाले होते.
हुतात्मा स्मारकापासून ते महात्मा गांधी रस्त्यापर्यंत ही मानवी श्रृंखला करण्यात आली होती. यावेळी या मानवी साखळीत सहभागी झालेल्या आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. गेल्या सात वर्षापासून मराठी शाळांची गळचेपी करत इंग्रजी शाळांना व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलं.
शिक्षणाचा मूलभूत अधिकाराचा दर्जा दिल्यानंतर कायद्याचा वापर करत मराठी संस्थाचालकांवर कारवाई करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत चालली आहे. मराठीच्या या उपेक्षेमुळे काढण्यात आलेल्या या मानवी साखळीत सर्वसामान्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
First Published: Friday, January 27, 2012, 00:02